TSK

TSK · निर्ग 21:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

इस्राएलाच्या वंशाशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही लोक यार्देन नदी पार करून कनानच्या प्रदेशात जाल.

¶ मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली.

तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यामध्ये तीन नगरे तुम्ही राखून ठेवा.

शेजाऱ्याच्या जमिनीची सीमा खूण काढू नको. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढे वतन दिले त्याच्या या खूणा आहेत.

“तू इस्राएल लोकांस सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला ज्या आश्रयस्थानाविषयी सांगितले होते ती नगरे तुम्ही आपल्यासाठी ठरवा;

पाहा आज तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले की, परमेश्वराने गुहेत आज तुम्हास माझ्या हाती दिले होते. तुम्हास जिवे मारावे असे कोणी मला सांगितले. पण मी तुम्हास सोडून दिले; मी बोललो की, मी आपला हात माझ्या प्रभूवर टाकणार नाही कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.

पण राजा त्यास म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो मी काय करू? दाविदाला शिव्याशाप दे असे परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. मग त्यास असे कोण म्हणू शकेल की, तू राजाला का शाप देत आहेस?”

धार्मिक मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे, आणि मनुष्यांमध्ये कोणीही सरळ नाही; ते सर्व रक्त पाडायला टपतात; ते प्रत्येकजण जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात.