TSK

TSK · यहे 13:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

“हे गर्विष्ठा, पाहा, मी तुझ्याविरूद्ध आहे” असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण हे गर्विष्ठा, तुझा दिवस आला आहे, मी तुला शिक्षा करण्याची वेळ आली आहे.

म्हणूनच परमेश्वर देव म्हणतो; पहा! मीच तुमच्या विरोधात काम करेन! तुम्हास केलेले शासन हे आजूबाजुच्या देशाच्या डोळ्यादेखत तुम्हावर होईल.

म्हणून, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा सोर, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि जसा समुद्र आपल्या लाटा उंचावतो तसे मी तुजविरूद्ध पुष्कळ राष्ट्रांना उठविन.”

व म्हण ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मिसराचा राज फारो, मी तुझ्याविरूद्ध आहे. आपल्या नद्यात पडून राहणाऱ्या समुद्रातला मोठा प्राणी, तू मला म्हणतोस, “ही नदी माझी आहे. ही मी आपल्या स्वतःसाठी निर्मिली आहे.”

त्यास सांग, ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, सेईर पर्वता, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि मी आपल्या हाताने तुला तडाखा देईन आणि तुला उजाड व दहशत करीन.

¶ आता “मानवाच्या मुला, तू गोगच्याविरूद्ध भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, पाहा! मी गोग, मेशेख आणि तुबाल यांचा अधिपती यांच्याविरूद्ध आहे.

पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तुझी वस्त्रे तुझ्या तोंडापर्यंत वर उचलीन आणि राष्ट्रांना तुझे गुप्त भाग, राजांना तुझी लाज दाखवीन.

कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.