TSK

TSK · यहे 21:26

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो. तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो.

¶ पुढे अबील मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखीनाला तोपर्यंत तुरुंगात पडून सदतीस वर्षे झाली होती. अबील मरोदखने सत्तेवर आल्यावर बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी हे सुटकेचे काम केले.

तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो.

राजाला आणि राणीच्या आईला सांग, स्वत:ला नम्र करा आणि खाली बसा, कारण तुमचा मुकुट, म्हणजे तुमचे गौरव आणि गर्व, खाली पडले आहे.

¶ त्यांनी राजाला पकडले व त्यास हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे वर नेले. तेथे त्याने त्यास शिक्षा ठरवली.

आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. म्हणून आम्हास हाय.

मी तुला नथ घातली आणि कानात बाळी घातली व सुंदर मुकुट तुझ्या डोक्यात घातला.

त्याने राज्य करणाऱ्यांना त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे आणि गरीबास उंचावले आहे.