TSK

TSK · यहे 39:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा जादूगारांनी फारोला सांगितले की, “यामध्ये देवाचा हात आहे.” परंतु फारोने मन कठीण केले व त्यांने त्यांचे ऐकायचे नाकारले. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच तसे झाले.

मी फारोचे मन कठीण करीन व तो त्यांचा पाठलाग करीन. मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन, मग मिसराच्या लोकांस समजेल की मी परमेश्वर आहे.” त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.

मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र केले; ते त्यांना म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश त्याच्याजागी परत पाठवून द्या, यासाठी की, त्याने आम्हास व आमच्या लोकांस मारू नये.” कारण तेथे सर्व नगरात मरणाचे भयंकर भय पसरले होते; देवाचा जबरदस्त हात त्यांच्यावर पडला होता.

कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.

परमेश्वरा, तुझा हात उंचावलेला आहे, पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तुझ्या लोकांबद्दल असलेला तुझा आवेश ते पाहतील आणि फजित होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील.

कारण तुम्ही माझ्या महान नावास राष्ट्रांमध्ये भ्रष्ट केल्यामुळे त्या राष्ट्रांनी अपवित्र मानले, ती ते पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्राच्या देखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रास समजेल की, मी प्रभू परमेश्वर आहे.

मग मी आपला महिमा व पवित्रता दाखवून देईन आणि माझी ओळख पुष्कळ राष्ट्रांना करून देईन; तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.

तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील आणि तू म्हणशील, “परमेश्वर इस्राएलाच्या सीमेपलीकडे थोर मानला जावो.”