TSK

TSK · उत्प 14:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

पूर्वी तेथे एमी लोक राहत असत. ते बहुसंख्य, धिप्पाड व अनाकी लोकांप्रमाणे महाकाय होते.

रेफाई लोकांपैकी बाशानाचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे.

तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.”

म्हणजे रेफाईतला जो एकटाच शेष राहिलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग याचे सारे राज्य, येथल्या सर्वांचा मोशेने मारून वतनातून बाहेर घालवले.

आणि अर्धा गिलाद, आणि बाशानात ओगाच्या राज्यातली नगरे अष्टारोथ व एद्रई यांसुद्धाही; असे मनश्शेचा पुत्र माखीर यांच्या संतानांना, म्हणजे माखीराच्या अर्ध्या संतानांना त्यांच्या कुळाप्रमाणे प्राप्त झाले.

पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.

त्यांना विपुल व चांगली गायराने मिळाली. तो देश मोठा असून शांत व स्वस्थ होता. हामाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.

आणि पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर छापे मारून त्यांना लुटले.

नंतर इस्राएल मिसरात आले, आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला.

त्याने हामाच्या देशात आश्चर्यकारक गोष्टी केल्या आणि लाल समुद्राजवळ पराक्रमी कृत्ये केली.

¶ मवाबाविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलांचा देव, असे म्हणतोः “नबोला हायहाय, कारण ते उध्वस्त झाले आहे. किर्या-थाईम काबीज केले गेले आहे आणि त्याची मानहानी झाली आहे. तिचे किल्ले पाडण्यात आणि अप्रतिष्ठीत केले गेले आहेत.