आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने ते खाल्ले.
TSK
TSK · उत्प 3:17
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.
अडचणी मातीतून येत नाहीत, किंवा संकटे रानातून उगवत नाहीत.
“मानव स्त्री पासून जन्मलेला आहे. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.
खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.
शिक्षक हे म्हणतो, धुक्याच्या वाफेसारखी, वाऱ्यातील झुळूकेसारखी प्रत्येक गोष्ट नाहीशी होईल, पुष्कळ प्रश्न मागे ठेवून जातील.
नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती, आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले, परंतु पुन्हा सर्वकाही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते; भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही.
कारण मनुष्य सूर्याच्या खाली जे सर्व श्रम करतो आणि आपल्या मनाने जे प्रयत्न करतो त्याकडून त्यास काय फायदा होतो?
पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधि व नियमांचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले, आणि सार्वकालीक करार मोडला आहे.
‹राजा त्यास म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता तू येथे कसा आलास? पण त्यास काही उत्तर देता येईना.›
‹मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.›
‹माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे.”›
कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली;