TSK

TSK · उत्प 32:20

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “जर असे आहे तर आता हे करा, त्या अधिकाऱ्याकरता आपल्या देशातले चांगले निवडक पदार्थ म्हणजे थोडा मध, मसाल्याचे पदार्थ व बोळ, पिस्ते, बदाम, डिंक, गंधरस वगैरे तुमच्या गोण्यांत घेऊन त्यास बक्षीस म्हणून घेऊन जा.”

तर आता तू काय करणार हे समजून विचार कर कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घरावर वाईट येण्याचे ठरले आहे; कारण त्याच्याशी कोणाच्याने बोलवत नाही एवढा तो वाईट आहे.”

म्हणून अलीफज, आता सात बैल आणि सात एडके घे. ते घेऊन माझ्या सेवकाकडे, ईयोबाकडे जा. त्यांना मार आणि त्यांचा स्वत:साठी होमबली अर्पण कर. माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईन. मग मी तुम्हास योग्य असलेली शिक्षा देणार नाही. तुम्ही अतिशय मूर्ख होता म्हणून तुम्हास शिक्षा करायला हवी. तुम्ही माझ्याविषयी नीट बोलला नाही. परंतु माझा सेवक ईयोब मात्र माझ्याबद्दल अगदी योग्य बोलला.

रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो.

गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते, आणि दडवलेली देणगी तीव्र कोप दूर करते.

जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.