TSK

TSK · होशे 13:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी, ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्याच्या हातून सोडवीत;

तेव्हा परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “लोक सांगतात त्या सर्वबाबतीत तू त्यांचा शब्द ऐक; कारण त्यांनी तुला नाकारले नाही, तर मला नाकारले आहे.

मग परमेश्वराने यरुब्बाल, बदान, व इफ्ताह, व शमुवेल यांना पाठवून तुम्हास तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला.

पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्यास अटक करून कैदेत टाकले.

देवा, तू माझा राजा आहेस, याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे.

तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे, पृथ्वीवर तारणारा तो आहे.

इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.

मी परमेश्वर आहे, तुमचा पवित्र प्रभू, इस्राएलाचा निर्माणकर्ता, तुमचा राजा आहे.

पाहा! माझ्या लोकांच्या कन्येचा रडण्याचा आवाज फार दूर असलेल्या देशातून येतो. “परमेश्वर सियोनात नाही काय? किंवा तिचा राजा तिच्यामध्ये नाही काय?” मग त्यांनी आपल्या कोरलेल्या प्रतिमांनी आणि निरुपयोगी मूर्तींनी मला का क्रोध आणला आहे.

त्यांनी राजे नेमले, पण माझ्या द्वारे नाही; त्यांनी राजपुत्र स्थापले आहे, पण माझे ज्ञान न घेता त्यांनी, आपले सोने व चांदी घेऊन, स्वत:साठी मूर्ती बनविल्या आहेत. त्यानेच ते नाश पावतील.

पण मी तुमचा देव परमेश्वर आहे, ज्याने तुम्हास मिसरातून बाहेर काढले, माझ्याशिवाय तुम्हास अन्य देव नाही, माझ्याशिवाय कोणी तारक नाही.

नथनेलाने उत्तर दिले, “रब्बी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहात.”