TSK

TSK · होशे 4:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधि व नियमांचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले, आणि सार्वकालीक करार मोडला आहे.

तर तुमच्या पापमय कृत्यांनी तुम्हास तुमच्या परमेश्वरापासून वेगळे केले आहे. आणि तुमच्या पापांनी त्यास आपले मुख लपवण्यास आणि तुमचे न ऐकण्यास भाग पाडले आहे.

परमेश्वर म्हणतो, “यरूशलेमच्या रस्त्यावरुन धावा, सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. सत्याचा शोध घेणारा आणि न्यायीपणाने चालणारा, असा कोणी एक मनुष्य जरी आढळला, तरी मी यरूशलेमेची क्षमा करीन.

मी या लोकांस का क्षमा करावी? तुझ्या मुलांनी माझा त्याग केला आणि त्यांनी जे देव नाही त्यांच्या शपथा वाहिल्या. मी त्यांना भरपूर खाऊ घातले, परंतू त्यांनी व्यभिचार केला आणि वारांगनेच्या घराचा मार्ग पकडला.

जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते, तशीच ही नगरी आपला दुष्टपणा ताजा ठेवते. तिच्यामध्ये लूटमार व हिंसाचार हे ऐकू येतात. पीडा आणि दु: ख सदोदीत माझ्या समोर आहे.

जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांस सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो, कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत.

असे घडले कारण, तिच्या संदेष्ट्यांनी पाप केले, तिच्या धर्मगुरुंनी दुष्कृत्ये केली, त्यांनी नीतिमान लोकांचे रक्त यरूशलेमामध्ये सांडले होते.

तुझ्यामध्ये असलेल्या संदेष्टयांच्या विरुध्द कारस्थान तुझ्यात आहे, जसा गर्जना करणारा सिंह आपल्या भक्षाला फाडून टाकतो, ते जीवन संपवून टाकतो आणि त्याने तिच्यात अनेकांना विधवा बनवले.

जशी लुटारुंची टोळी टपून बसते, तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत.

ते आपल्या वाईटाने राजाला, आणि लबाडीने अधिकाऱ्याला खूश करतात.

एफ्राईमाने परमेश्वराचा क्रोध अत्यंत चेतवला आहे. म्हणून त्याचा धनी त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्यावर आणिल आणि त्याच्या लज्जास्पद कामाची त्यास परतफेड करील.

जे तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. जे तुम्ही लोकांची चामडी सोलता आणि त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.

अजूनपण वाईटाचा पैसा आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत.

त्या बंडखोर नगरीला हाय हाय! ती हिंसेनी भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे.

सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की “जे सत्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर प्रेम व करुणा दाखवा. प्रत्येक मनुष्याने आपल्या बंधू बरोबर असे वागावे.

ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरूषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्यास धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात.

आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो.