तुमची चांदी अशुद्ध झाली आहे, तुमच्या द्राक्षरसात पाणी मिसळले आहे.
TSK
TSK · यश 1:25
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ तेव्हा मी म्हटले, “प्रभू, असे किती वेळपर्यंत?” त्याने उत्तर दिले, “नगरे चिरडून उध्वस्त आणि रहिवाशांविरहित होईपर्यंत, आणि घरे लोकविरहीत व जमीन उजाड वैराण होईपर्यंत,
तू आपल्या कपटामध्ये राहतो, त्यांच्या कपटामुळे ते मला ओळखायला नाकारतात, असे परमेश्वर म्हणतो.
तुम्हातील बंडखोर व माझ्याशी फितुर कोण यांची मी साफ सफाई करणार, अल्पकाळ जे इतर राष्ट्रात राहत होते, त्यांना मी बाहेर घालवून देणार व पुनःरुपी ते इस्राएलात प्रवेश करणार नाही. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
जसे चांदीला भट्टीत अग्नीने वितळवले जाते, तसा तू त्यांच्यात वितळविला जाशील मग तुला कळेल मी परमेश्वर देवाने तुझ्या विरुध्द त्वेषाची ओतणी केली आहे.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे तलवारी, माझ्या मेंढपाळांवर प्रहार कर व माझ्या मित्रावर वार कर; मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढरे पळून जातील आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन.
त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”