TSK

TSK · यश 36:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ हिज्कीया राजा ह्याच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व तटबंदी नगरांवर हल्ला चढवून त्यांचा ताबा घेतला.

यहूदातील भक्कम नगरांचा पाडाव केल्यावर शिशकने आपले सैन्य यरूशलेमेला आणले.

तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत. तुमच्या देखत परकीयांनी तुमची शेते उध्द्वस्त केली आहेत. परकीयांनी ती नासधूस करून, उलथून सोडून दिली आहेत.

¶ त्यावेळी प्रभू अश्शूरच्या राजाचा एका भाड्याने घेतलेल्या वस्तऱ्याप्रमाणे उपयोग करून, तुमच्या डोक्याच्या व पायांच्या केसांचा मुंडण करील तो तुमची दाढी देखील तासून काढील.

आणि तो पुढे वाहत यहूदात शिरेल व त्यास बुडवेल, पुराचे पाणी वाढत व पसरत तुमच्या गळ्याला लागेपर्यंत येईल. हे इम्मानुएला, त्याचे पसरलेले पंख तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”

पाहा त्याचे वीर बाहेर रस्त्यात रडत आहेत; शांतीचा संदेश आणणारे शांतीच्या आशेने स्फुंदून जोराने रडत आहेत.

कारण तिच्या जखमा बऱ्या न होणाऱ्या आहेत. कारण त्या यहूदापर्यंत आल्या आहेत, आणि तो माझ्या मनुष्यांच्या वेशीपर्यंत, यरूशलेमपर्यंत पोहोचला आहे.