तू कधी स्वस्थ बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस ते मला माहित आहे.
TSK
TSK · यश 37:29
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्यास वेसण घालता येईल का? किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का?
म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही. त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.”
तुझ्या सभास्थानात तुझे शत्रू गर्जना करीत आहेत; त्यांनी युद्धाची झेंडे उभारले आहेत.
पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत, आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे.
सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.
¶ रब-शाके त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीयाला सांगा, अश्शूरचा महान राजा म्हणतो, तुझ्या विश्वासाचा स्त्रोत काय आहे?
पाहा, मी एक आत्मा त्याच्यात घालीन आणि तो काही बातमी ऐकून आपल्या देशात परत जाईल, तो आपल्याच देशात तलवारीने पडेल, असे मी करीन.
तो ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने निघून जाईल; तो या नगरात प्रवेश करणार नाही, ही परमेश्वराची घोषणा आहे.
तुम्ही आपल्या तोंडाने मजविरूद्ध जेव्हा फुशारकी मारली; तुम्ही माझ्याविरूद्ध पुष्कळ गोष्टी बोललात. मी ते ऐकले आहे.”
परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की, पाहा, ते तुम्हास आकड्यांनी, आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील, असे दिवस तुम्हावर येतील.
लोकांच्या पुढे आपले काही चालत नाही हे पिलाताने पाहिले. पण उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले व म्हटले, “या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा.”
शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, ‹“शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?”›