परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.”
TSK
TSK · यश 50:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
नदीतले मासे मरण पावले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसरी लोकांस नदीतील पाणी पिववेना. अवघ्या मिसर देशात रक्तच रक्त झाले.
परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमीवरून भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले.
तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.
त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला. मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले.
समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली.
समुद्राचे पाणी पूर्ण कोरडे पडेल आणि नदी आटेल व रिक्त होईल.”
जेव्हा मी पाहिले, तेथे कोणी नाही, मी त्यांना विचारले असता, एका शब्दाने तरी उत्तर देऊ शकेल असा त्यांच्यामध्ये कोणीही नाही, एक चांगला सल्ला देऊ शकेल असा कोणी नाही.
परमेश्वर जो समुद्रातून मार्ग आणि प्रचंड पाण्यातून वाट उघडतो,
समुद्र आटवायला तू कारणीभूत झालास. ज्याने मोठ्या डोहातील पाणी सुकवले आणि समुद्रातील अति सखोल भागाचा रस्ता केला, ह्यासाठी की खंडणी भरून सोडवलेले पार होतील, तो तूच नाही काय?
त्याने पाहिले की कोणी मनुष्य नाही, आणि कोणी मध्यस्थही नाही. तेव्हा त्याच्याच बाहूने त्याच्याकडे तारण आणले, आणि त्याच्याच न्यायीपणाने त्यास आधार दिला.
कारण आम्ही सगळे त्या प्रमाणे झालो आहोत जे अशुद्ध आहे. आणि आमच्या सर्व नीतिमान कृती या मासिक पाळीच्या चिंध्यांसारख्या आहेत, आम्ही सर्व पानांप्रमाणे सुकून जातो; आमच्या पापांनी आम्हास, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.
अशाच प्रकारे मी त्यांची शिक्षा निवडेन. ते ज्या गोष्टींना फार भितात तिच त्यांच्यावर आणीन. कारण जेव्हा मी बोलावले तेव्हा कोणी उत्तर दिले नाही. जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले आणि ज्यात मला संतोष नाही ते त्यांनी निवडले.
इस्राएलाच्या लोकांनो, तुम्हीही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” परमेश्वर असे म्हणतो! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलाविले, पण तुम्ही उत्तर दिले नाही.
¶ इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही.
¶ त्यामुळे मी ठराव करतो की, कुणीही लोक, कुठल्याही देशाचे, कोणतीही भाषा बोलणारे जर शद्रख, मेशख, अबेदनगो, यांच्या देवाच्या विरोधात बोलतील तर त्यांचे तुकडे करण्यात येतील, आणि त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविणारा दुसरा कोणता देव नाही.
तो आम्हास सुरक्षीत करतो, आणि आम्हास सोडवतो. तो स्वर्ग आणि पृथ्वीवर चिन्ह; आणि चमत्कार करतो त्याने दानीएलास सिंहाच्या पंजातून सोडवले.
माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही.
मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, ‹“शांत हो! स्तब्ध राहा.”› मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.
‹आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;›