“पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनाचे वंशज आहेत लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात.
TSK
TSK · योए 1:9
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
सियोनेचे मार्ग शोक करतात, कारण नेमलेल्या पवित्र सणाला कोणीही येत नाही. तिच्या सर्व वेशी ओसाड झाल्या आहेत व तिचे याजक कण्हत आहेत. तिच्या कुमारी दु:खात आहेत, व ती स्वत: निराशेत आहेत.
ते परमेश्वरास द्राक्षरसाचे पेयार्पणे देणार नाही, व ते त्यास प्रसन्न करु शकणार नाहीत, त्यांचे बलीदान त्यांच्यासाठी शोकाची भाकर होईल जे ते खातील ते अशुद्ध होतील, कारण त्यांचे भोजन त्यांच्यापुरतेच असेल, ते परमेश्वराच्या मंदीरात आणता येणार नाही.
आमच्या डोळ्यादेखत आमचे अन्न काढून घेतले, आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्लास नष्ट झाले नाहीत काय?
याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना, द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. त्यांनी म्हणावे, परमेश्वरा, आपल्या लोकांवर दया कर. आणि आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. म्हणून राष्ट्रांनी त्यांच्यावर अधिकार करावा. राष्ट्रांनी आपसात असे कां म्हणावे त्यांचा देव कोठे आहे?