¶ या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”
TSK
TSK · योए 2:21
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तर आता तुम्ही स्वतःला सादर करा आणि जी मोठी गोष्ट परमेश्वर तुमच्या डोळ्यांपुढे करणार आहे ती पाहा.
रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत.
आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत.
सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले.
निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि कमळाप्रमाने बहरेल.
अहो, आकाशांनो, गायन करा, तुम्ही पृथ्वीच्या खालील अधोलोकांनो आरोळी मारा; अहो पर्वतांनो व रान, त्यातली सर्व झाडे गायन करा; कारण परमेश्वराने याकोबास उद्धारीले आहे आणि इस्राएलात आपले प्रताप दाखविले आहे.
कारण तुम्ही आनंदाने बाहेर जाल आणि शांतीने चालवले जाल; तुमच्यापुढे डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील आणि शेतांतील सर्व झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन.
मी उत्तरेकडून हल्ला करणाऱ्यांना तुम्हापासून दूर करीन, आणि मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात घालवून देईन. त्यांची आघाडी पूर्व समुद्रात आणि त्यांची पिछाडी पश्चिम समुद्रात जाईल. त्यांचा दुर्गध चढेल. आणि तेथे वाईट दुर्गंधी पसरेल. मी महान गोष्टी करीन.”
“पण आता मात्र माझे मन:परिवर्तन झाले आहे. आणि म्हणून मी यरूशलेमेवर व यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचे ठरविले आहे. तेव्हा घाबरु नका!