TSK

TSK · योहा 15:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही. राष्ट्रे त्याच्या आज्ञा पाळतील.

आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.

¶ त्या दिवशी परमेश्वराचे रोपटे सुंदर व गौरवी होईल. इस्राएलात राहणाऱ्याकरिता भूमीचे फळ चविष्ट व आनंददायी होईल.

तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे गाणे म्हणतील.

सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील.

पुष्कळ मेंढपाळांनी माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी माझा वाटा पायदळी तुडविला आहे, त्यांनी माझा आनंददायक भाग वैराण व वाळवंटात पालटवला आहे.

इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास विपुल फळे येतात. जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या. त्याची भूमी सुपीक झाली, तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.

¶ ‹“म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला.›

¶ येशू त्यांना दाखले सांगून शिकवू लागला, ‹“एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षरसासाठी कुंड खणले आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला.›

¶ जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता.

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, ‹“मी तुम्हास खरे खरे सांगतो, मोशेने तुम्हास स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो.›

कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.