TSK

TSK · योना 3:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.

परमेश्वर सापडेल त्याकाळी त्यास शोधा; तो जवळ असतानाच त्यास बोलवा.

त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही आणि त्यांचे अंग ते आपल्या कृत्यांनी झाकू शकणार नाहीत. त्यांची कृत्ये ही पापाची कृत्ये आहेत, आणि त्यांच्या हातात हिंसेची कामे आहेत.

¶ पण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.

तथापि “इस्राएलाच्या घराण्या मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेन.” हे परमेश्वर देव जाहीर करतो, पश्चाताप कर व आपल्या सर्व अपराधापासून मागे वळ जे तुझ्या विरुध्द दुष्कर्माने अडखळण झाले होते.

म्हणून हे राजा माझी मसलत तुला मान्य असो, पाप सोडून योग्य ते कर, आपली दुष्टता सोडून जाचलेल्यावर दया कर. असे केल्यास तुझी समृध्दी जास्त दिवस राहील.”

¶ तेव्हा ते परमेश्वराचा धावा करत म्हणाले, “हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो या मनुष्याच्या जिवामुळे आमचा नाश होऊ नये, आणि त्याच्या मृत्यूचा दोष आम्हावर येऊ नये; कारण हे परमेश्वरा, जसे तुला योग्य वाटेल तसे तू केले आहेस.”

तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून पश्चात्ताप करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे;