TSK

TSK · यहो 2:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

ती स्त्री गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला; तो फार सुंदर आहे असे पाहून तिने त्यास तीन महिने लपवून ठेवले.

¶ इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती त्यांच्याकडे धाब्यावर गेली,

त्या मनुष्याच्या पत्नीने आडावर एक चादर पसरून वर धान्य ओतले. त्यामुळे तिथे धान्याची रास आहे असे दिसू लागले. तेव्हा तिथे योनाथान आणि अहीमास लपले असतील अशी शंकाही कोणाला आली नाही.

ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा जे मी केले ते माझ्या धन्याला माहीत नाही काय? मी परमेश्वराच्या शंभर संदेष्ट्यांना पन्नास पन्नास असे गुहांमध्ये लपवले आणि त्यांना खायला प्यायला पुरवले.

यहोयाकीम राजाने लेखक बारूखाला व यिर्मया संदेष्ट्याला अटक करण्यासाठी हम्मेलेखाचा मुलगा यरहमेल व अज्रीएलाचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या यांना आज्ञा केली. पण त्यांना परमेश्वराने लपविले होते.

कारण तुम्ही मृत झला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.

तसेच राहाब वेश्येने जेव्हा जासुसांना आत घेतले व दुसर्‍या वाटेने पाठवून दिले, तेव्हा ती कृतीनी नीतिमान ठरली नाही काय?