TSK

TSK · लेवी 21:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

या नंतर तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझी सुन तामार हिने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या व्यभिचारामुळे ती आता गरोदर राहिली आहे.” यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढा व जाळून टाका.”

¶ कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये!

यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्यास दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.

आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास यांच्यावर जे येईल तेच तुला चिन्ह होईल; ते दोघेही एकाच दिवशी मरतील.

सियोनेतील पापी घाबरले आहेत. अधर्म्यास थरकाप सुटला आहे. आमच्यातला कोण जाळून टाकणाऱ्या अग्नीत वस्ती करील?

¶ पाहा! मी तुमच्या वंशजांना शिक्षा करीन आणि तुमच्या यज्ञपशूंचे शेण मी तुमच्या तोंडावर फाशीन, आणि त्याबरोबर तुम्हासही फेकून देण्यात येईल.

आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा.