TSK

TSK · लेवी 23:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

अहरोनाने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने त्या वासरापुढे एक वेदी बांधली आणि जाहीर करून तो म्हणाला, “तुमच्या परमेश्वराकरता उद्या उत्सव होणार आहे.”

त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हास पिढ्यानपिढ्या निरंतरचा नियम होय.

तेव्हा ह्याप्रमाणे परमेश्वराने नेमिलेले सण मोशेने इस्राएल लोकांस कळवले.

¶ तसेच तुम्ही आनंदाच्या प्रसंगी, तुमचे दोन्ही नियमीत सण व महिन्याच्या सुरवातीच्या दिवशी तुमची होमार्पणाच्या, शांत्यर्पणाच्या यज्ञांच्या सन्मानासाठी तुम्ही कर्णे वाजवावेत. तुमच्या परमेश्वरास तुमची आठवण करून देण्याची ही एक कृती आहे. हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.

येहू म्हणाला, “बआलसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा याजकांनी त्याची घोषणा केली.

बैर-शेबापासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली कि परमेश्वर देव ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणासाठी यरूशलेमेला यायला सर्व लोकांस आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता.

नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.

सियोनेकडे पाहा, हे नगर आपल्या मेजवाणीचे आहे; तुझे डोळे यरूशलेमेकडे शांतीचे वस्तीस्थान म्हणून पाहतील. त्याचा तंबू कधीही काढणार नाहीत, त्याच्या खुंट्या कधीही उपटणार नाहीत, ज्याच्या दोरखंडातील एकही दोरी तुटणार नाही.

वादविवादाचा न्याय करण्यास त्यांनी तत्पर असावे. माझ्या निर्णयाप्रमाणे त्यांनी निवाडा करावा. ते माझ्या सर्व नेमलेल्या सणात माझे विधी व माझे नियम पाळतील, आणि माझे शब्बाथ दिवस पवित्र पाळावेत.

पवित्र उपास नेमा, आणि पवित्र सभेसाठी लोकांस एकत्र बोलवा. तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांस व देशात राहणाऱ्या लोकांस एकत्र गोळा करा. आणि परमेश्वरास आरोळी मारा.

¶ तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केला, आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वांनी गोणताट नेसले.

¶ त्यानंतर यहूद्यांचा सण होता आणि येशू यरूशलेम शहरास वर गेला.