TSK

TSK · लेवी 26:41

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्यापुढे नम्र होण्याचे कोठवर नाकारशील? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.

“अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपर्यंत मी त्यास संकटात लोटणार नाही. त्याचा पुत्र राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.”

रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील राग कमी झाला. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.

मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला.

पुढे त्याचे पिता मनश्शे जसे परमेश्वरास नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट आमोनाची दुष्कृत्ये वाढतच चालली.

¶ हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तू न्यायी आहेस. तू आजच्याप्रमाणे आम्हास वाचवून अवशेष ठेवले आहेस. पाहा, आम्ही इथे तुझ्यापुढे आमच्या अपराधामुळे आहोत, यामुळे तुझ्यापुढे कोणालाहि उभे राहता येत नाही.”

मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस.

अहो यहूदातील मनुष्यांनो आणि यरूशलेममधील रहिवास्यांनो, परमेश्वरासाठी तुम्ही आपली सुंता करा व आपले हृदय परमेश्वराला समर्पण करा. नाही तर तुमच्यातील कोणालाही विझवता न येणारा माझा क्रोधाचा अग्नी बाहेर पडून तुम्हास जाळून टाकील. हे असे घडण्याचे कारण तुम्ही केलेल्या दुष्कृत्ये आहेत.”

परमेश्वर असे म्हणतो, ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याचे दिवस येत आहेत.

तेव्हा त्यांचे मार्ग आणि कार्य पाहून तुम्हास दिलासा मिळेल, त्यांचे मी जे काही केले ते सगळे मी निरर्थक केले नाही. हे तुम्हास कळेल असे परमेश्वर देव म्हणतो.

कारण तुम्ही माझी भाकर, चरबी व रक्त अर्पण करताना जे मनाने व शरीरानेही बेसुंती अश्या परक्या लोकांस माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यात भर टाकली आहे.

¶ आमच्या देवा, हे परमेश्वरा धार्मिकता, न्यायत्व तुझे आहे तथापि आज आमची तोंडे लज्जीत झाली आहेत. यहूदाचे यरूशलेमेत राहणारे सर्व इस्राएलाचे सर्व निवासी त्यामध्ये आहेत, त्यांनी तुझ्या विरूद्ध केलेल्या अपराधामुळे, त्यांना तू सर्व देशात विखुरले होते कारण आम्ही तुझ्या विरोधात पाप केले.

‹जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येकजण मोठा गणला जाईल.›

‹मी तुम्हास सांगतो हा मनुष्य त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा न्यायी ठरुन घरी गेला कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्यास कमी केले जाईल आणि जो कोणी स्वतःला कमी करतो त्यास उंच केले जाईल.”›

कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही.

कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत.

पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.”