TSK

TSK · लेवी 26:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ “परंतु परमेश्वराविरूद्ध बंड करू नका आणि त्या देशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपल्या अन्नाप्रमाणे आपण त्यांना सहज भक्ष्य करू. त्यांचे संरक्षण त्यांच्यापासून काढले जाईल, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहे. त्यांना घाबरु नका.”

तुमच्यावर चाल करून येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हास परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी पळत सुटेल.

तुमच्यातला एक मनुष्य हजारांची पाठ पुरवील, कारण की तुमचा देव परमेश्वर याने जसे तुम्हाला सांगितले, तसा तो स्वत: तुमच्यासाठी लढतो.

नंतर त्यास गाढवाचे ताजे जाभाड सापडले आणि त्याने ते उचलले आणि त्याच्याने एक हजार माणसे मारली.

मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्या मागोमाग चढून गेला. तेव्हा योनाथानासमोर पलिष्टी पडले व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक त्यांना मारीत गेला.

दावीदाकडील उत्तम सैनिकांची यादी: याशबाम, हा हखमोनीचा पुत्र, तीस जणांचा सेनापती होता. त्याने एका प्रसंगी आपल्या भाल्याने तीनशे मनुष्यांना ठार मारले.

मग मी त्यांच्या शत्रूंचा त्वरेने पराभव करीन आणि अत्याचार करणाऱ्याविरूद्ध आपला हात फिरवीन.