इस्राएल लोकांस सांग: एखाद्या मनुष्याने परमेश्वरास मानवाचा विशेष नवस केला तर त्या मनुष्याचे मोल याजकाने याप्रमाणे ठरवावे.
TSK
TSK · लेवी 5:4
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाहीतर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले. तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
मग यहोशवाने त्यांच्याशी समेट केला आणि त्यांना जीवन बहाल करून सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन दिले. लोकांच्या नेत्यांनीही त्यांच्याशी शपथ घेतली.
असे होईल की मी अम्मोनी लोकांपासून शांतीने माघारी आलो तेव्हा मला भेटावयाला जे काही माझ्या घराच्या दाराबाहेर येईल, ते परमेश्वराचे होईल, आणि मी त्याचे होमार्पण यज्ञ करीन.”
आम्ही आपल्या कन्येतून त्यांना स्त्रिया करून देऊ शकत नाही. कारण इस्राएलाच्या लोकांनी अशी शपथ वाहिली होती की, जो बन्यामिनाला पत्नी करून देतो, तो शापित होईल.”
त्या दिवशी इस्राएली पुरुष निराश झाले कारण शौलाने लोकांस शपथ घालून सांगितले होते, संध्याकाळपर्यंत मी आपल्या शत्रूचा सूड घेईपर्यंत जो पुरुष काही खाईल त्यास शाप लागो. म्हणून लोकांतल्या कोणी काही खाल्ले नाही.
जे काही त्याचे आहे त्या सर्वातून एकही पुरूष जर मी सकाळ उजाडेपर्यंत राहू दिला, तर परमेश्वर दावीदाला तसे व त्यापेक्षा अधिक करो.”
राजा म्हणाला, “आज दिवस मावळेपर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!”
तुझ्या मुखाने बोलण्याची घाई करू नको, आणि देवासमोर कोणतीही गोष्ट उच्चारायला तुझे मन उतावळे करू नको. देव स्वर्गात आहे पण तू तर पृथ्वीवर आहेस. म्हणून तुझे शब्द मोजकेच असावे.
करार मोडून राजाने शपथेला तुच्छ लेखले, पाहा! तो आपल्या हाताने वचनप्राप्ती करेल, पण त्याने जे केले त्यासाठी तो निभावणार नाही.
हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावयाची आज्ञा केली.
¶ मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.