म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
TSK
TSK · लूक 10:28
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मी त्यांना माझे नियम व निर्णय लावून दिले त्यास दाखवून दिलेत ह्यासाठी की जो कोणी हे पाळेल त्यांचा बचाव होईल.
परंतू त्यांच्या मुलामुलींनी देखील माझ्या विरोधात तीव्र विरोध केला. ते नियमांनी चालले नाहीत किंवा करार पाळला नाही, ज्या आज्ञा पाळल्याने मनुष्य वाचतो. त्यांनी माझ्या शब्बाथाचा अनादर केला, तेव्हा मी ठरवले की मी रानात त्यांच्यावर क्रोधाची वृष्टी करावी ह्यासाठी माझा क्रोध पूर्ण करावा.
येशूने पाहिले की, त्या मनुष्याने शहाणपणाने उत्तर दिले आहे. तेव्हा तो त्यास म्हणाला, ‹“तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.”› त्यानंतर त्यास प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही पण ‘जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्यायोगे जगेल.’