TSK

TSK · मत्त. 13:22

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

आखानाने यहोशवाला उत्तर दिले की, “मी खरोखर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध पाप केले आहे; आणि मी जे केले ते हे:

पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला, आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले.

जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल, परंतु नीतिमान पानाप्रमाणे झपाट्याने वाढेल.

तेथे अशाप्रकारचा कोणी मनुष्य आहे, तो एकटाच असून त्यास दुसरा कोणी नाही. त्यास मुलगा किंवा भाऊ नाही. परंतु तेथे त्याच्या कष्टाला अंत नाही. मिळकतीच्या धनाने त्याच्या नेत्राचे समाधान होत नाही. तो स्वतःशीच विचार करून म्हणतो, मी इतके कष्ट कोणासाठी करीत आहे? आणि माझ्या जिवाचे सुख हिरावून घेत आहे? हेही व्यर्थ आहे, वाईट कष्टमय आहे.

जे मी भूतलावर पाहिले असे एक मोठे अरिष्ट आहे, ते म्हणजे धन्याने आपल्या अहितास आपले राखून ठेवलेले धन होय.

‹कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याशी एकनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तसेच तुम्हास देवाची आणि पैशाची›‹सेवा एकाच वेळी करता येणार नाही.›

¶ नंतर पाहा, कोणीएक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?”

¶ येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, ‹“देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे किती कठीण आहे.”›

‹मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही.”›

‹तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका.›

तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लोकांस म्हणाला, ‹“ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे!›

¶ तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य व त्याची पत्नी सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली,

पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात.

कारण देमास मला सोडून थेस्सलनीका शहरास गेला आहे कारण त्यास जगाचे सुख प्रिय आहे. क्रेस्केस गलतीया प्रांतास गेला आहे व तीत दालमतीया प्रांतास गेला आहे.

¶ जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.