TSK

TSK · मत्त. 2:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

“तू उत्तम प्रकारचे मसाले घे; म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, पाचशे शेकेल सुगंधी बच,

¶ जेव्हा कोणी परमेश्वरासमोर अन्नार्पण घेऊन येईल, तेव्हा त्याने अर्पणासाठी सपीठ आणावे; त्याने त्यामध्ये तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;

त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे, एक सोन्याचे पात्र आणले.

परंतु काही कुचकामी माणसे होती ती म्हणाली, “हा पुरुष आम्हास कसा काय सोडवील?” त्यांनी त्याचा अनादर केला व त्यास काही भेट आणली नाही. पण शौल शांत राहिला.

मग शबाच्या राणीने राजाला एकशे वीस किक्कार सोने, नजर केले. शिवाय मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ आणि मौल्यवान हिरे दिले. इस्राएलामध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले.

तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. हस्तिदंताच्या महालातून तंतुवाद्यांनी तुला आनंदीत केले आहे.

राजा जगेल, त्यास शबाचे सोने दिले जावो. लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करो; देव त्यास दिवसभर आशीर्वाद देवो.

मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील, शेबातले सर्व येतील, ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.

“यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.”

तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”

आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तू मरणार नाही असे पवित्र आत्म्याने त्यास प्रकट केले होते.

‹पिता कोणाचा न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे.›

¶ आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना होत्या.

ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो.