तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय संभाळील, परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील, कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.
TSK
TSK · नहू 1:8
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पण दुष्टाचे मार्ग अंधकारासारखे आहेत, ते कशाशी अडखळले हे त्यांना समजत नाही.
ते पृथ्वीकडे दृष्टी टाकतील आणि पाहा विपत्ती अंधकार व दु:खाचे निराशेचे काहूर त्यांना दिसेल. ते अंधकाराच्या भूमीत लोटले जातील.
तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा विरवला जाईल आणि अधोलोकाशी तुमचा झालेला करार रद्द केला जाईल. जेव्हा प्रकोपाचा पूर पार केला जाईल, त्या द्वारे तुम्ही झाकले जाल.
यास्तव परमेश्वर देव हे सांगत आहे, माझ्या संतापामुळे मी वादळ घेऊन येईन, आणि माझ्या क्रोधामुळे पुर येईल; गारा पडल्यामुळे समुळ नाश होईल.
¶ त्याचे पुत्र लढाई करतील आणि मोठे सैन्य जमवतील ते पुराप्रमाणे येत राहतील ते लढाई करून पुन्हा लढाई करून गडापर्यंत धडकतील.
¶ शेवटच्या वेळी दक्षिणेचा राजा हल्ला करील. उत्तरेचा राजा त्याकडे रथ, स्वार आणि अनेक जहाजे घेऊन वाऱ्यासारखा येईल. तो अनेक राज्यावर हल्ला करून त्यांना पुरासारखे पुसून टाकील.
आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात, तो प्रभू, सैन्यांचा परमेश्वर आहे, आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार व मिसरच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार.
¶ निनवे एक पाण्याच्या तळ्यासारखी आहे, पाण्याच्या जोरदार वेगासारखे लोक जलद दूर जात आहेत. दुसरे किंचाळतात, थांबा! थांबा, परंतु कोणीही मागे वळून पाहत नाही.
‹मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”›
त्याच्यायोगे, तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला.