TSK

TSK · गण 16:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

यासाठी की, आम्ही या ठिकाणाचा नाश करणार आहोत. कारण या लोकांच्या दुष्टतेचा फार मोठा बोभाटा परमेश्वरासमोर झाला आहे, म्हणून त्याने आम्हांला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.”

तर आता मला आड येऊ नको, त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने भस्म करतो. नंतर मी तुझ्यापासूनच एक महान राष्ट्र निर्माण करतो.”

मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.”

त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले.

कसे अचानक ते उध्वस्त झाले. आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले.

त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. ते सर्व सैनिक आहेत.

आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन.

¶ म्हणून, आम्हास अढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू;