TSK

TSK · गण 17:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली.

परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.

(स्त्री स्वतःशी बोलते) जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडांमध्ये तसा माझा प्रियकर इतर पुरुषांमध्ये आहे. त्याच्या सावलीत मला बसायला खूप आनंद झाला. आणि त्याच्या फळाची चव मला गोड लागली.

मग सर्व झाडाच्या पक्षांना कळेल की मी परमेश्वर देव आहे, मी उच्च झाड खाली आणेन; मी लहान झाडाला उच्च करीन, मी सुकलेल्या झाडाला पाणी देईन; कारण मी त्यांच्यावर वारा वाहून वाळवले आहे. मी परमेश्वर देव आहे, मी जे जाहीर केले आहे ते घडेल.

तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकीली, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.

त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची धूपाटणे आणि संपूर्ण सोन्याने मढवलेला कराराचा कोष लाकडी पेटी होती. त्या कोषात एका सोन्याच्या भांड्यात मान्ना होता, तसेच कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या.