TSK

TSK · गण 25:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्यांची सेवा करू नको; किंवा त्यांच्या पाया पडू नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझा विरोध करतात, त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;

तू सावध राहा. या देशातील रहिवाशाबरोबर कोणत्याही प्रकारचे करारमदार करू नको; ते व्यभिचारी मतीने आपल्या देवामागे लागून त्यांना बलिदान करतील. त्यातल्या कोणी तुला बोलावले असता तुम्ही त्यांच्या बलिदानातले काही खाल.

पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही,

तुमचा देव परमेश्वर याने जो करार पाळण्याची तुम्हाला आज्ञा केली आहे, तो मोडून दुसऱ्या देवाची सेवा कराल, आणि त्यांना नमन कराल, तर देवाचा राग तुम्हावर भडकेल, आणि जो उत्तम देश त्याने तुम्हाला दिला आहे, त्यातून तुम्हाला त्वरीत नष्ट करील.”

एलीया, इस्राएलमध्ये बआलापुढे कधी वाकले नाहीत असे सात हजार लोक अजूनही आहेत. यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बालमूर्तीचे चुंबन घेतलेले नाही.”

परमेश्वर म्हणतो, मला इस्राएल जेव्हा आढळला तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता, अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले.

नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण देवरहित परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही.

आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’