TSK

TSK · गण 26:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

कोरहाचे पुत्रः अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे.

¶ ते लोक जिवंतपणी कबरेत गेले आणि त्यांची सगळी चीजवस्तूही त्यांच्याबरोबर गेली. नंतर जमीन पूर्ववत झाली. ते नष्ट झाले-लोकांतुन नाहीसे झाले.

¶ मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.

शल्लूम हा कोरे याचा पुत्र. कोरे हा एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहाच्या वंशातले होते. निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते परमेश्वराच्या छावणीवर कामदार असून व्दारपालाचे काम पार पाडत होते.

हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस.

देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.

आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.

थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.