तेव्हा त्याची पत्नी त्यास म्हणाली, “जर परमेश्वर देवाला आपल्याला मारायची इच्छा असती, तर त्याने आपल्या हातातून होमार्पण व अन्नार्पण स्वीकारले नसते, आणि या सर्व गोष्टी आपल्याला दाखवल्या नसत्या, तसेच या वेळेसारखे वर्तमान आपल्याला ऐकवले नसते.”
TSK
TSK · नीति 31:26
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
नगरात एक चाणाक्ष स्त्री राहत होती. तिने नगरातून मोठ्याने ओरडून सांगितले, “माझे ऐका. यवाबाला येथे यायला सांगा. मला त्याच्याशी काही बोलायचे आहे.”
¶ जेव्हा एस्तेरच्या दासी आणि तिचे सेवक खोजे तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला मर्दखयाविषयी सांगितले, तेव्हा राणी एस्तेर अतिशय दु:खी आणि नाराज झाली. गोणताटाच्या ऐवजी घालायला तिने मर्दखयाकडे वस्रे पाठवली, पण त्याने ती स्विकारली नाहीत.
¶ तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, “राजा, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपली मर्जी असेल तर मला व माझ्या लोकांसही जिवदान द्यावे. एवढेच माझे मागणे आहे.
नीतिमानाच्या मुखातून ज्ञानाचे फळ निघते, पण कपटी जीभ कापली जाईल.
आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत.
धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते, आणि मऊ जीभ हाड फोडते.
माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या खडकात लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुझे मुख पाहू दे. मला तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझा चेहरा खूप सुंदर आहे.
खरे शिक्षण त्याच्या मुखात होते आणि त्याच्या ओठांत अनीती आढळली नव्हती. शांतीने आणि सरळपणाने तो माझ्यात चालला, आणि त्याने अन्यायापासून पुष्कळांना फिरवले.
ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.
तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रस्किला व अक्विला ह्यांनी त्यांचे भाषण ऐकूण त्यास जवळ बोलावून घेतले व त्यास देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.
¶ बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या.
पण अंतःकरणात गुप्त राहणार्या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी.