पाहा, मी लोहाराला निर्माण केले, जो तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो आणि आपल्या कामासाठी हत्यार घडवितो आणि विनाशासाठी मी विनाशक उत्पन्न करतो.
TSK
TSK · जख 2:1
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मग त्याने मला तेथे आणले. पाहा तेथे पितळेच्या रूपासारखा असा एक मनुष्य होता. त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी व मापण्याची काठी होती. व तो वेशीजवळ उभा होता.
मग त्याने आणखी एक हजार हाताचे अंतर मोजून पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले, तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. आणि आणखी हजार हात अंतर मोजून मला पाण्यातून चालावयास लावले तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते.
म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी यरूशलेमेकडे करुणामय होऊन परत फिरलो आहे. माझे निवासस्थान तिच्यात पुन्हा बांधले जाईल.” सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मापनसूत्र यरूशलेमेवर लावण्यात येईल.”
¶ मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा बोरू देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, “ऊठ आणि देवाचे भवन, वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे.