त्यांनी त्यांना बाहेर आणल्यावर त्यातील एक पुरुष म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वाचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या मैदानात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; डोंगराकडे निसटून जा म्हणजे तुमचा नाश होणार नाही.”
TSK
TSK · जख 2:6
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “मित्रा, येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला.
तुम्ही निघा, तुम्ही निघा, तुम्ही येथून निघून जा, अपवित्र गोष्टींना स्पर्श करू नका. तुम्ही त्यामधून निघून जा, जे तुम्ही परमेश्वराची पात्रे वाहता ते तुम्ही आपणाला शुद्ध करा.
परमेश्वर मला म्हणाला, “देशातील राहणाऱ्या सर्वांवर उत्तरेकडून आपत्तीचा वर्षाव होईल,
पृथ्वीवरच्या सर्व राज्यांत मी त्यांना भयंकर गोष्ट असे करीन, मनश्शेने, हिज्कीयाचा मुलगा, यहूदाचा राजा, याने जे यरूशलेममध्ये केले, या कारणास्तव मी असे करीण.
राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा. तुम्ही राष्ट्रांनी म्हणावे, ज्याने इस्राएल विखरला तोच त्यास एकवटील आणि जसा मेंढपाळ आपल्या कळपाला राखतो तसा तो त्यास राखील.
“बाबेलच्या मध्यापासून भटका आणि खास्द्यांच्या देशातून निघून जा; जसे कळपाच्या पुढे चालणारा एडका तसे तुम्ही व्हा.
माझ्या लोकांनो, बाबेलाच्या शहरातून बाहेर या. माझ्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येकजण आपला जीव वाचवा.
घातक साथीच्या रोगाने तुम्हातील तिसरा भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेन, तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ भुकमरी, सभोवताली तलवारीने तुझे लोक नाश पावतील. सर्व दिशांनी तलवार येऊन तुझा पिच्छा करील.
मी त्यांना सगळ्या अवतीभोवती असलेल्या त्यांच्या मदत करणाऱ्यांना व त्यांच्या सेनेची पांगापांग करेन, आणि त्यांचा पाठलाग तलवारीने करेन.
“पाहा, मी आज्ञा करीन, धान्य चाळण्यासारखे मी इस्राएलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळीन, व त्यातील लहान अशी कणी देखील भूमीवर पडणार नाही.”
“अहो! बाबेलकन्येसोबत राहणाऱ्यांनो, सियोनेकडे पळून स्वतःचा बचाव करा!”
¶ मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली; ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या. म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत.