TSK

TSK · 1 योहा 1:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ एखाद्या मनुष्याच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यंत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्यास अंगभर तपासावे,

यशयाने विचारले, “त्यांनी या घरातले काय काय पाहिले?” हिज्कीयाने सांगितले, “त्यांनी सगळेच पाहिले. माझे सगळे भांडार मी त्यांच्यापुढे उघडे केले.”

“तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे मनुष्य कसा बरोबर ठरेल?

मनुष्य तो काय, जो निष्कलंक असेल? स्त्री पासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार?

तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस. कारण तुझ्या दृष्टीने कोणीही नितीमान नाही.

जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही. असा या पृथ्वीवर एकही नीतिमान मनुष्य नाही.

कारण आम्ही सगळे त्या प्रमाणे झालो आहोत जे अशुद्ध आहे. आणि आमच्या सर्व नीतिमान कृती या मासिक पाळीच्या चिंध्यांसारख्या आहेत, आम्ही सर्व पानांप्रमाणे सुकून जातो; आमच्या पापांनी आम्हास, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.

कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत;

कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो.

पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.

¶ जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जीभेवर ताबा ठेवत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाला फसवतो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे.

त्यांचे वाईट होईल ह्यात त्यांना त्यांच्या वाईट करण्याचे प्रतिफळ मिळेल. ते दिवसाच्या ख्यालीखुशालीत सुख मानतात; ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर ते जेवतात तेव्हा ते दंगली करून मजा करतात.

जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही त्यास लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.

तुम्हास माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्याठायी पाप नाही.

कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषययी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला.