TSK

TSK · प्रेषि 2:30

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

इस्राएल लोकांवर मी, परमेश्वर, शास्ते नेमिले होते तेव्हापासून दुर्जनांनी त्यांना त्रास दिला तसे आता घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की, तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.

¶ आणि असे होईल की जेव्हा तुझे दिवस परिपूर्ण होऊन तू आपल्या पूर्वजाकडे गेल्यावर, मी तुझ्यानंतर तुझ्या वंशातून जो तुझा पुत्र, त्यास मी उभे करीन, मी त्याचे राज्य स्थापीन.

हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय, राजाच्या मुलाला आपले न्यायीपण दे.

पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.

परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.

कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा राजा असे म्हणतील.

¶ परमेश्वराचे असे म्हणणे आहे, पाहा! असे दिवस येत आहेत जे मी इस्राएल आणि यहूदाच्या घराण्यासाठी जे वचन दिले आहे ते मी करीन.

पण हे, बेथलहेम एफ्राथा.

त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले.

पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव.

देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो.

येशूने उत्तर दिले, ‹“माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर यहूद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; पण माझे राज्य येथले नाही.”›

ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला.

¶ माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर.

त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्चित केली असून त्यास तो “आज” हा एक असा दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावीदाच्या द्वारे असे म्हणतो, “आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.”

¶ हा मलकीसदेक शालेमाचा राजा व तो सर्वोच्च देवाचा याजक होता. अब्राहाम राजांचा पराभव करून परत येत असताना मलकीसदेक त्यास भेटला. मलकीसदेकाने त्यास आशीर्वाद दिला.

कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.

त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे.