TSK

TSK · प्रेषि 21:39

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

प्रभू हनन्याला म्हणाला, ‹“ऊठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहूदाचे घर शोध व तार्सस शहराहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार सध्या तो तेथे आहे; व प्रार्थना करीत आहे.›

¶ त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः “अंत्युखिया, सिरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग या बंधुजनांचा सलाम.

परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हास उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे.”

¶ मी यहूदी आहे, माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी या शहरांत गमलियेलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.

या मनुष्यास यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळाल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्यास सोडवले.

पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्‍या प्रत्येक मनुष्यास सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा.