तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आता लवकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून ते वेश्येसमान त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.”
TSK
TSK · आमो 2:4
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले;
असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस, आणि त्याच्या पत्नीचा स्वतःची पत्नी म्हणून स्विकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास.
नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अति दु:ख प्रदर्शित करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली.
आपले पिता किंवा भाऊबंद यांचे अनुकरण करु नका. परमेश्वर त्यांचा देव होता, पण त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तेव्हा त्यांच्याविषयी परमेश्वराने इतरांच्या मनात घृणा निर्माण केली व त्यांना निंदेला प्रवृत्त केले. त्यामुळे झालेली दुर्दशा तुम्ही पाहिली आहेच.
आम्ही तुझ्या विरूद्ध अतिशय वाईट वर्तन केले आहे. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.
त्यांनी पुन्हा तुझ्या नियमाकडे वळावे म्हणून तू त्यास बजावलेस. तरी हट्टीपणाने वागून त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. जो कोणी तुझ्या आज्ञा पाळतो तो जिवंत राहतो. पण त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले. त्यांनी आज्ञापालन केले नाही, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही व त्यांनी त्या ऐकण्याचेहि नाकारले.
नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.
हे जसे तो जर राख खातो; त्याचे फसवलेले हृदय चुकीच्या मार्गाने नेते. तो आपल्या जीवाला वाचवू शकत नाही किंवा तो म्हणत नाही, “माझ्या हातात धरलेल्या या गोष्टी खोटे देव आहेत.” असे तो म्हणणार नाही.
आणि चंद्र, सूर्य, आकाशातले तारे, ज्यांना ते अनुसरले आणि सेवा केली, ज्यांच्या ते मागे चालले आणि पूजन केले, त्यांच्यापुढे पसरतील, ती गोळा केल्या जाणार नाही किंवा पुरल्या जाणार नाही, ती पृथ्वीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.
हे असे झाले कारण ते आपल्या दुराग्रही हृदयाच्या मर्जी प्रमाणे वागले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल्या प्रमाणे, बालदेवास अनुसरले.”
पण तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्ही वाईट पापे केलीत. कारण पाहा! प्रत्येक मनुष्य आपल्या दुष्ट हृदयाच्या हट्टाप्रमाणे चालत आहे. कोणीही असा नाही जो माझे ऐकतो.
पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरूशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरूशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.”
¶ संदेष्टे माझ्या नावाने खोटे भविष्य करतात, ते म्हणतात, मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे! मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे.
लोकांस खोटा दृष्टांत आणि खोटे भाकीत कळले आहे, जो कोणी म्हणतो परमेश्वर देव अमुक तमुक जाहीर करीत आहे. परमेश्वर देवाने त्यांना पाठवले नसतांनाही त्यांनी लोकांस आशा दिली आहे, आणि त्यांनी दिलेला संदेश खरा ठरेल.
¶ मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला.
मी शपथ वाहिली कारण त्यांनी माझा करार मोडला माझ्या नियमांनी ते चालले नाहीत आणि माझ्या शब्बाथाचा अनादर केला, कारण त्यांचे अंतःकरण मूर्तीशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले.
हे करण्यासाठी मी ठराव केला ह्यासाठी की, जेव्हापासून त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, माझ्या शब्बाथाचा व नियमांचा अनादर केला. कारण त्यांची दृष्टी त्यांच्या वाडवडीलांच्या मूर्तीकडे लागली होती.
तू माझ्या पवित्र वस्तुंना तुच्छ लेखल्या आहेस व माझ्या शब्बाथाचा अनादर केला आहे.
¶ तिची बहिण अहलीबा हिने हे पाहिले, पण तिने आपल्या बहिणीहून अधिक व्यभिचार केला आणि वेश्याकर्म केले.
ह्यास्तव मी एफ्राईमाला कसर आणि यहूदाच्या घराण्यास किडीसारखा होईन.
परमेश्वराचा वाद यहूदाशी आहे. आणि तो याकोबास त्याच्या कृत्याचे शासन करील. त्यांचे प्रतिफळ त्यास मिळेल.
“पृथ्वीवरील सर्व घराण्यांमधून, मी फक्त तुम्हास निवडले आहे. म्हणून मी तुमच्या सर्व पापांसाठी तुम्हास शिक्षा करीन.”
त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन.
कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.