त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत.
TSK
TSK · दानि 2:45
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे.
ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही.
सगळी परिस्थिती मी डोळ्यांखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूंची भीती बाळगू नका. आमचा प्रभू, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे, त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुले, मुली, आपल्या स्त्रिया आणि घरेदारे यांच्यासाठी लढा.”
होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आम्ही त्याच्या वर्षाची संख्या पाहाणे अशक्य आहे.
आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.
परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे.
यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “पाहा, मी सियोनेत आधारशिला, पारखलेला धोंडा, कोपऱ्याचा मोलवान धोंडा, स्थीर पाया म्हणून घालतो. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल, तो लाजवला जाणार नाही.
¶ हे सगळे झाल्यानंतर दानीएल ज्याची नेमणूक राजाने बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा वध करण्यास ज्याची नेमणूक केली होती त्या अर्योकाकडे जाऊन म्हणाला, “बाबेलाच्या ज्ञानी लोकांस ठार करु नको, तर मला राजासमोर घेऊन जा म्हणजे मी त्यास स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगेन.”
¶ त्या राजाच्या दिवसात स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधीही नाश होणार नाही, त्यास कोणी जिंकणार नाही ते तर सर्व राज्याचे तुकडे करून त्या सर्वांचा नाश करील व ते सर्व काळ टिकेल.
त्या दिवसात मी यरूशलेमेला सर्व राष्ट्रांसाठी एक प्रचंड मोठ्या दगडाप्रमाणे करीन, तो त्या सर्वांना भारी होईल. जो त्या दगडाला उचलण्याचा प्रयत्न करील, तो स्वत:च जखमी होईल आणि जगातील सर्व राष्ट्रे यरूशलेमेच्या विरुध्द लढावयास एकत्र येतील.”
येशू म्हणाला, ‹“मीसुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हास सांगेन.›
¶ परूश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल, येशूने त्यांना उत्तर दिले, ‹“देवाचे राज्य दृश्य स्वरुपात येत नाही.›
‹म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस, ज्या घडत आहेत आणि ज्या यानंतर घडणार आहेत त्याही लिही.›
¶ आणि मी बघितले की, एक देवदूत सूर्यात उभा होता; तो आकाशात उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणालाः या आणि देवाच्या मोठ्या भोजनासाठी जमा व्हा;