TSK

TSK · अनु 32:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएली लोकांकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?”

माझ्यासाठी मातीची वेदी बांधा आणि तिजवर तुझी मेंढरे व तुझे बैल यांची होमार्पणे व शांत्यर्पणे वाहा; जेथे जेथे मी माझ्या नावाची आठवण व्हावी म्हणून मी सांगतो तेथे तेथे मी येऊन तुम्हास आशीर्वाद देईन.

तेव्हा मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला; आणि त्याने परमेश्वर या नावाची घोषणा केली.

आणि म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हास त्याचे तेज आणि महानता दाखवली आहे. त्यास प्रत्यक्ष अग्नीतून बोलताना आम्ही ऐकले. देव मनुष्याशी बोलला तरी मनुष्य जगू शकतो हे आम्ही पाहिले आहे.

¶ त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.”

देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो.

ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात, आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात.

माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.

त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.

त्याच्या दिवसात यहूदा तरला जाईल, आणि इस्राएल सुरक्षित राहील. आणि ज्या नावाने त्यास हाक मारतील ते हे, म्हणजे परमेश्वर आमचे न्यायीपण असे असेल.

¶ ‹जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे.›

आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय ते तुम्ही त्याच्या शक्तीशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे.