TSK

TSK · निर्ग 21:14

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मनुष्य एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो. किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो. किंवा कोणाला काही फेकून मारून सुद्धा त्यास ठार करु शकतो.

जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याचे तेथे हजर असणाऱ्या याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्यास चांगले शासन करा. त्यास मृत्यूदंड द्या. इस्राएलातून या नीच मनुष्याचे उच्चाटन करा.

पण द्वेषापोटीही एखादा मनुष्य संधीची वाट पाहत लपूनछपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून या नगरात पळून गेला.

लेवींनी म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”

त्याने अमासास विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्यास पुढे खेचले.

ही बातमी यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घट्ट धरुन बसला.

हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा तलवारीने वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”

जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही. आणि त्यास कोणीही मदत करणार नाही.

विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. स्वैर, स्वच्छंदी असे हे लोक, सत्तांविषयी वाईट बोलण्यात हे कचरत नाहीत.