TSK

TSK · निर्ग 32:12

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला.

परमेश्वराने त्यांना जो देश देण्याचे शपथपूर्वक सांगितले होते त्यामध्ये तो आणू शकला नाही म्हणून त्याने त्यांना रानात मारून टाकले.

तू त्यांना शासन केलेस तर मिसरमधील लोक म्हणतील, परमेश्वर त्यांना स्वत:च कबूल केलेल्या प्रदेशात नेऊ शकला नाही. त्यांचा तो द्वेष करत होता. म्हणून मारुन टाकण्यासाठीच त्याने त्यांना रानात आणले.

लोकांच्या आठवणीतून ते पुसले जातील इतका मी या इस्राएलांचा नाश केला असता.

परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहील. आपल्या सेवकांवर दया दाखवील. पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन, असहाय्य करून सोडील.

त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली; ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला राग शांत झाला. यावरुन त्या स्थळाला आजपर्यंत अखोरचे खोरे असे म्हणतात.

हे परमेश्वरा, वैऱ्याने तुझ्याकडे अपमान भिरकावला आहे; आणि मूर्ख लोकांनी तुझ्या नावाची निंदा केली आहे त्याची आठवण कर

हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर; आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर.

हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर.

तुझ्या नावाला हाक मारेल असा कोणी नाही आहे, आणि तुला धरून घ्यायला कोणी प्रयत्न करीत नाही. कराण तू आपले मुख आम्हापासून लपवले आहे आणि आम्हांस आमच्या पातकांच्या हाती सोपवून दिले आहे.

माझ्या पवित्र नामास्तव ज्या राष्ट्रात ते राहत आहेत त्यांच्या दृष्टीपुढे माझ्या नामाचा अनादर होऊ नये म्हणून मी हे कार्य केले आहे, त्यांना मिसर देशातून काढून त्याच्या दृष्टीसमोर मी त्यास प्रकट झालो.

परंतू मी आपल्या नामास्तव आपला हात आवरला ह्यासाठी की ज्या राष्ट्रातून इस्राएलांना मी बाहेर त्यांच्या दृष्टीसमोर माझा अनादर होऊ नये, म्हणून मी कृती केली आहे.

मग परमेश्वराचे या गोष्टीबाबत हृदयपरिवर्तन झाले. प्रभू परमेश्वर म्हणाला, “हे ही घडणार नाही.”

¶ सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले होते.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला.