मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहचला व त्याने तेथे तंबू ठोकला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि परमेश्वराचे नाव घेऊन प्रार्थना केली.
TSK
TSK · उत्प 21:33
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तेव्हा इसहाकाने तेथे वेदी बांधली व परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. त्याने तेथे आपला तंबू ठोकला आणि त्याच्या नोकरांनी एक विहीर खणली.
जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारू नका.
¶ इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा मूर्तींची उपासना करू लागले;
तुला माहीत नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, पृथ्वीच्या सीमा निर्माण करणारा, थकत किंवा दमत नाही; त्याच्या बुद्धीला मर्यादा नाही.
पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. तोच जिवंत आणि सार्वकालीक राजा आहे. पृथ्वी त्याच्या क्रोधाने कंपन पावते आणि त्याचा कोप राष्ट्रे सहन करु शकत नाहीत.
¶ कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही.
¶ आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.