TSK

TSK · उत्प 42:21

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

योसेफ त्याच्या भावांजवळ येऊन पोहचला तेव्हा त्यांनी त्याचा सुंदर झगा काढून घेतला.

तेव्हा प्यालेबरदार फारोस म्हणाला, “आज मला माझ्या अपराधाची आठवण होत आहे.

¶ पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरूद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास शासन होईल याची खात्री बाळगा.

मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस.

नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.

जर, साखळदंडानी ठेवले, जर त्यांना त्रासाच्या दोऱ्यांनी बांधून ठेवले

जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही, तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही.

जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही. आणि त्यास कोणीही मदत करणार नाही.

तुझे दुष्कृत्ये तुला दोष देतील आणि तुझा अविश्वासूपणा तुला शिक्षा देईल. तर आता ह्यावर विचार कर, मी, परमेश्वर तुझा देव, तू माझा त्याग केला आहे, आणि तुझ्या ठायी माझे भय नाही हे किती वाईट आणि कडू आहे!” प्रभू सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.

यास्तव परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या भावास व सहकारी इस्राएलास स्वातंत्र्य जाहीर करायचे होते. तुम्ही माझे ऐकले नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हाविरुध्द तलवारीला, मरीला आणि दुष्काळाला स्वातंत्र्य जाहीर करतो, कारण पृथ्वीवरील प्रत्येक राज्याच्या दृष्टीने मी तुम्हास असे काही करीन की, त्याबद्दल ऐकून भीतीने थरथर कापाल.

‹कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल.›

‹जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.›

‹लाजराला माझ्या पाच भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत.›

कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.