पेकह इस्राएलचा राजा असताना, अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करून आला. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल-बेथ-माका यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांस कैद करून अश्शूरला नेले.
TSK
TSK · होशे 5:13
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
याचवेळी अदोमच्या लोकांनी यहूदावर चढाई करून त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहूदी लोकांस कैद करून नेले. तेव्हा राजा आहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली.
आहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली पण त्याचाही फायदा झाला नाही.
तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत, कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे, मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धन्याप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.
एफ्राईम कबुतरा सारखा भोळा व भावनाहीन आहे, तो मिसराला हाक मारतो, नंतर अश्शूरास उडून जातो.
ते अश्शूरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील. एफ्राईम लज्जीत होईल, आणि मुर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे इस्राएल लज्जीत होईल.
अश्शूर आम्हास तारणार नाही, आम्ही युध्दासाठी घोड्यावर स्वार होणार नाही, यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही, कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते.