TSK

TSK · यश 28:1

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्याने इस्रएलाच्या लेबो-हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंत भूमी परत घेतली. गथ-हेफेर मधला संदेष्टा अमित्तयाचा मुलगा योना याला इस्राएलच्या परमेश्वराने सांगितले त्याप्रमाणेच हे घडले.

तीन वर्षांच्या अखेरीस त्याने ते घेतले. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या सहाव्या वर्षी हे झाले. अर्थातच इस्राएलचा राजा एलाचा मुलगा होशे याच्या नवव्या वर्षी त्यांनी शोमरोन घेतले.

त्यामुळे निरोप्यांनी राजाचा संदेश इस्राएल आणि यहूदाभर फिरवला. त्याचा मसुदा असा होता: “इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल (याकोब) यांच्या परमेश्वर देवाकडे परत फिरा. म्हणजे अश्शूर राजांच्या तावडीतून सुटून जे सुखरुप राहिले आहेत त्यांना परमेश्वर जवळ करील.

सकाळी उठून मद्याच्या शोधास लागणाऱ्यांनो तुम्हास हाय हाय! जे तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.

कारण अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन आहे. पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.

कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.”

सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात,

एफ्राइममधील मद्याप्यांचा अभिमानी मुकुट पायाखाली तुडवला जाईल.

वेश्यागमन, द्राक्षरस, आणि नवा द्राक्षरस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे.

इस्राएलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे, एफ्राईमाचा व्यभिचार तेथे आहे, आणि इस्राएल प्रदुषित झाला आहे.

आणि ते प्रत्येक वेदीजवळ गहाण घेतलेल्या कपड्यांवर पडतात, आणि आपल्या दैवतांच्या मंदिरात ज्याच्याकडून दंड घेतला त्यांचा द्राक्षरस पितात.

शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, “आण आणि आम्ही पीऊ.” ते तुम्ही हे वचन ऐका.

तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि आपल्या गाद्यांवर पसरता. तुम्ही कळपातील कोकरे, आणि गोठ्यातील वासरे खाता.

सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, प्रभू परमेश्वराने आपलीच शपथ वाहीली आहे की, “मी याकोबाच्या अभिमानाचा तिरस्कार करतो, त्याच्या किल्ल्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी ती नगरी व त्यातील सर्वकाही शत्रूच्या हाती देईल.”