TSK

TSK · यश 33:16

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.

तो माझे पाय हरिणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगरावर ठेवतो!

तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.

माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.

जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.

पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो, आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो.

परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”

कारण तू गोरगरीबांचा रक्षणकर्ता आहेस, गरजूंना त्यांच्या दुःखाच्या समयी तू संरक्षक असा आहेस. जेव्हा निर्दयींचा फटका भींतीला लागणाऱ्या वादळासारखा असतो, तेव्हा तू उन्हाच्या तापात त्यांची सावली व सकंटाच्या वादळात त्यांचा निवारा असा आहेस.

जरी परमेश्वर तुला संकटाची भाकर आणि दु:खाचे पाणी देईल, तरी तुझे शिक्षक पुन्हा लपू शकणार नाही, तर तुझे डोळे तुझ्या शिक्षकांना पाहतील.

त्यांना भूक व तहान लागणार नाही, तळपणारा सूर्य आणि उष्णता त्यांना इजा करणार नाहीत. कारण जो त्यांच्यावर दया करतो, तो त्यांना घेऊन चालेल. तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.

‹तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका.›