TSK

TSK · यश 57:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “तुझे माझे काय आहे? तू आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” तेव्हा इस्राएलाच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, कारण परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले, ह्यासाठी की मवाबाकडून आम्ही पराभूत व्हावे.”

परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.

कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.

जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.

परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.

हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.

लोभी मनुष्य संकटे निर्माण करतो, पण जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याची भरभराट होते.

परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.

तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील. आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील.

त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन; त्यांची होमार्पणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील, कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील.

मी याकोबामधून वंशज आणीन आणि यहूदातून माझ्या पर्वताचा वतनदार उत्पन्न करीन. माझ्या निवडलेल्यांना ती भूमी वतन मिळेल आणि माझे सेवक तेथे राहतील.

लांडगे आणि कोकरे एकत्र चरतील, आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. पण धूळ ही सापाचे अन्न होईल. माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे परमेश्वर म्हणतो.

तर तुम्ही स्वत:साठी घडविलेले देव कोठे आहेत? संकट समयी तुम्हास सोडावयास त्या समर्थ असतील तर त्यांनी उठून यावे. कारण हे यहूदा, तुझ्या शहरांइतक्या तुझ्या मूर्त्या आहेत!

“लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड. बाशानच्या डोंगरात तुझा आवाज उंच कर. अबारीमच्या डोंगरापासून ओरड, कारण तुझ्या सर्व मित्रांचा नाश केला जाईल.

माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलाच्या पर्वत शिखरावर हे परमेश्वर देव जाहीर करत आहे, सर्व इस्राएलाचे घराणे त्यांच्या भूमित माझी आराधना करतील. तुझ्या अर्पणांनी मी तेथे आनंदी होईन आणि पवित्र ठिकाणी आणलेल्या खंडणीचे प्रथम फळ ते अर्पितील.

मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या पवित्र पर्वतावर, म्हणजे सियोनात मी राहतो. तेव्हा यरूशलेम पवित्र होईल. आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके येणार जाणार नाहीत.