TSK

TSK · याको 5:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

लाबान म्हणाला, “ही दगडांची रास आज माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी आहे.” म्हणून त्याचे नाव गलेद ठेवले.

¶ त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.”

आणि यहोशवाने सर्व लोकांस म्हटले, “पाहा, ही धोंड आमच्याविषयी साक्षीदार होईल, कारण की परमेश्वराने आपली जी सर्व वचने आमच्याजवळ सांगितली ती हिने ऐकली आहेत; तर ही तुमच्याविषयी साक्षीदार यासाठी व्हावी की तुम्ही आपल्या देवाला कधी नाकारू नये.”

तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांस वाटते.

त्यांच्या शत्रूंनी आणि त्यांच्या जिवावर टपणारे, जो वेढा आणि यातना त्यांच्यावर आणतील, त्यामध्ये ते स्वत:च्याच मुलांचे आणि मुलींचे मांस खातील आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्यास खाईल, असे मी त्यांना करीन.

परंतु नंतरच्या दिवसात असे होईल की, परमेश्वराच्या घराचा पर्वत, इतर पर्वतांवर स्थापित केला जाईल व तो डोंगरावर उंचावला जाईल. आणि लोकांचा प्रवाह त्याकडे येईल.

पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.

¶ यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो.

आणि तू बघितलीस ती दहा शिंगे आणि तो पशू त्या वेश्येचा द्वेष करतील. तिला ओसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील आणि तिला अग्नीत जाळतील.

पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”