TSK

TSK · यिर्म 1:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे.

परमेश्वराने मला विचारले, “यिर्मया, तू काय पाहिलेस?” मी म्हणालो, “मी अंजीर पाहिली. चांगली अंजीर फारच उत्तम आहेत. पण वाईट अंजीर फारच नासकी आहेत. ती खाण्यासारखी नाहीत.”

म्हणून परमेश्वर देव म्हणतो, ज्या लोकांस तुम्ही मारले त्यांची प्रेते यरूशलेम शहराच्या मध्यभागी ठेवलेली आहेत, हे शहर भांडे आणि ते मांस आहेत, पण तुम्ही त्यांना शहराच्या मध्य भागातून घेऊन यायचे आहे.

¶ आणि या फितुर घराण्या विरुध्द म्हणी बोल, दाखले देऊन सांग, प्रभू परमेश्वर देव असे सांगत आहे. एक जेवण शिजवण्याचे भांडे घे व त्यामध्ये पाणी ओत.

मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला भरीव सोन्याने बनलेला दिपवृक्ष, ज्याच्यावर एक वाटी आहे, असे दिसत आहे. त्यावर सात दिवे आहेत. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.